EDU

कॉमर्सच्या मुला मुलींसाठी जपानी भाषा का शिकावी? व कॉमर्सच्या मुला मुलींसाठी जपान मधील संधी

पोस्ट जरा मोठ्ठी आहे पण CA व CMA किंवा कॉमर्सच्या मुला मुलींनी जरूर वाचावी.

जपान हा देश गेले ३० वर्ष सतत जगातील पहिल्या किंवा दुसरा क्रमांकाची अर्थव्यवस्था राहिला आहे. सध्या जपान ३ ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. म्हणजेच येथे खूप कारखाने आहेत व अनेक वस्तूंचे उत्पादन केले जाते. त्यामुळे इथे नोकरीच्या संधी सुद्धा खूप उपलब्ध आहेत.

मी गेले ४ वर्षे जपान मध्ये वास्तव्यास आहे, नक्कीच ह्या मध्ये विशेष असे काही नाही कारण भारतातील बरेच जण परदेशात काम करतात आणि भारतीय लोकांनी जवळपास सर्व देशांमध्ये आपला ठसा उमटवला आहे.

पण मी जपान मध्ये फायनान्स मध्ये काम करतो व असे करणारे भारतीय लोक हे बोटावर मोजता येतील इतपत आहेत. मी जपानला माझ्या भारतातल्या कंपनीच्या माध्यमातुन त्यांच्याच दुसऱ्या जपानच्या फॅक्टरी मध्ये आलो व आल्यानंतर जपानी भाषा शिकलो व अजूनही शिकत आहे. तोपर्यंत मला सुद्धा ह्या देशाबद्दल व इथल्या उपलब्ध संधी बद्दल फारशी माहिती नव्हती. कारण कॉमर्स फिल्डच्या माणसाला जपान बद्दल माहिती व आकर्षणही नसते.

थोडक्यात काय तर जपान मध्ये येणारे सर्वजण हे IT किंवा technical field मधील असतात. त्याला कारणहि असेच आहे. Engineering मुले/मुली  IT चा कोर्स करतात व IT कंपनीच्या माध्यमातून जपान मध्ये onsite येतात. एकदा जपानचा work visa मिळाला कि जपानमध्ये येऊन नवीन कंपनी जॉईन करतात.

तसेच बरेच Engineers झालेले मुले मुली जपानी भाषा शिकतात व स्वतःहून स्व:बळावर जपान मध्ये येतात.

मग असे का? फक्त इंजिनिर्सच किंवा टेक्निकल फील्डचीच मुले मुली का?

कारण IT engineers भारतासारखे स्वस्त कुठेच नाहीत व आपल्या भारतीयांचे IT फील्ड मध्ये कामही चांगले असते. त्यामुळे IT Company ला कायम नवीन प्रोजेक्ट्स मिळतात व onsite engineers ची गरज लागत असते

कॉमर्ससाठी असे नसते कारण अकाउंट्स किंवा फायनान्स साठी जपानी भाषा येणे बंधनकारक आहे. जपान मध्ये इंग्रजी भाषा मुळीच बोलत नाही त्यामुळे सर्व व्यवहार हे जपानी भाषेत होतात. अकाऊंट्स व फायन्सास सुद्धा जपानी भाषेत असते बरका ! साधे ‘Yes/No’ व ‘Thank You’ सुद्धा जपानी भाषेत बोलतत.

आता आपले कॉमर्सवाले किती जण जपानी भाषा शिकतात ? १००० मध्ये १ जण आणि तो किंवा ती IT कंपनी मध्ये काम करत असेल.

म्हणजे काय तर थोडक्यात कॉमर्स मधील पदवी + CA किंवा CMA, त्याबरोबर अकाऊंट्स आणि फायनान्स मधील अनुभव असणारे व जपानी भाषा येणारे हे जवळपास नाहीतच. अजून त्याबरोबर SAP माहिती असणारे मुळीच नाहीच.

हे मी का सांगत आहे? कारण मला जानेवारी २०२० मध्ये मी ज्या कंपनीमध्ये काम करतो त्या कंपनीत फायनान्स डिपार्टमेंट मध्ये CA किंवा CMA झालेला एकजण पाहिजे होता. पण मला कोणीही अशी भारतीय व्यक्ती सापडली नाही ज्याला वर नमूद केलेले skills आहेत. (टीप: जागा भरली आहे,)

त्याचवेळेस मला समजले, कोणीही कॉमर्सची पदवी असलेले CA किंवा CMA व अकाऊंट्स आणि फायनान्स मधील अनुभव असणारे भारतीय लोक जपानी भाषा शिकत नाहीत.

त्यामुळे, कॉमर्सची पदवी असलेले व अकाऊंट्स आणि फायनान्स मधील अनुभव असणाऱ्यांनी जपानी भाषा जरूर शिकावी व आपले skill develop करावे.

कारण:

१) जपान मध्ये खूप नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्या मध्ये अकाऊंट्स आणि फायनान्सतर भरपूर संधी आहेत.

जपान सरकारच्या नोव्हेंबर २०१९ च्या माहितीनुसार जपान मध्ये १०० लोकांच्या मागे १६३ नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. कारण जपानची लोकसंख्या दर वर्षी झपाट्याने कमी होत आहे व त्यामुळे त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. पुढील दहा वर्षात जपानमध्ये लोकांची गरज ही वाढत जाणार आहे.

Source;Japan Times: https://www.japantimes.co.jp/news/2018/10/30/business/economy-business/japans-job-availability-improves-fresh-44-year-high-september/#.Xu9EvkUzaUk

जपान सरकारची वेबसाईट: https://www.mhlw.go.jp/english/database/db-l/general_workers.html

२) नक्कीच जपान मधील पगार हा तुमच्या जपानी भाषेवर व तुमच्या अनुभवानुसार अवलंबून आहे. पण कमीतकमी ३०-४० लाख जपानी येन व त्यापेक्षा जास्त असेल. सध्याच्या भारतीय चलन दरा नुसार ३० लाख येन  X ०.७० पैसे  = २१ लाख रुपये.

३) जपानी भाषा पूर्णपणे शिकायला (N2 Business Level) ३-४ वर्ष लागतात. जर तुम्ही सध्या कॉमर्स कॉलेज मध्ये असाल व हि पोस्ट वाचत असाल तर तुम्ही नक्की जपानी भाषा शिकून जपान मध्ये स्व:बळावर येऊ शकता.

४) जपानी भाषा उत्तम रित्या येत (N2 Business Level) असेल तर इंग्रजी भाषेची गरज मुळीच नाही, त्यामुळे तुम्हाला इंग्रजी बोलता येत नसेल तरी बिनधास्त राहा कारण येथे सर्व काही जपानी भाषेत होते.

५) शिकायला जपानी भाषा सोपी आहे कारण हि भाषा मराठी सारखीच आहे. जपानी भाषेचे व्याकरण हे पूर्णपणे मराठी भाषे सारखे आहे. फक्त तुम्हाला नवीन लिपी व नवीन शब्द शिकावे लागतात.

६) Graduate झाल्या नंतर IELTS व GMAT ची परीक्षा देऊन तुम्ही १००% scholarship वर जपानमध्ये  Post-Graduate करू शकतात. किंवा

७) जरी तुम्हाला ३-४ वर्षाचा कामाचा अनुभव असेल तरी सुद्धा तुम्ही जपान मध्ये सरळ Post-Graduate साठी अर्ज करू शकता. त्याला सुद्धा तुम्हाला १००% Scholarship मिळते.

८) कॉमर्सच्या मुला मुलीनी कॉलेज बरोबरच व जमले तर् ११वी पासूनच जपानी भाषा शिकावी (N2 Business Level पर्यंत). आठवड्यातून फक्त ३-४ तास द्यावे लागतील. त्यामुळे तुम्हाला भारतात जपानी कंपनीमध्ये सहज जॉब मिळेल व तुम्ही त्या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा जपानला येऊ शकता.

जपानच का? तर् लक्षात घ्या जर यूरोप व इतर देशातील लोक जपान मध्ये नोकरी करावयास व राहायला येतात म्हणजे येथे नक्कीच काहीतरी त्याच्या देशापेक्षा जास्त आहे.

जपान बद्दलच्या अधिक माहितीसाठी कृपया Google करा. 

आपण फक्त अमेरिका, कॅनडा व यूरोप चा आग्रह न ठेवता जपान बद्दल नक्की विचार करा.

कृपया हि पोस्ट नावासहित फॉरवर्ड करावयास हरकत नाही.

गौरव मोघे
योकोहोमा, जपान
जून २५, २०२०

https://www.linkedin.com/in/gaurav-ゴウラブ-moghe-モゲ-a2503215

Share this:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *